फाउंडेशन तर्फे 21 वर्षीय मुलीला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली

navrashtra

फाउंडेशन तर्फे 21 वर्षीय मुलीला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली

मुलीचे नाव #वैष्णवी_वसंतराव #आव्हाड, वय 21, राहणार मुक्काम पोस्ट रेनापुर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील असून, तिचे आई व वडील शेतमजूर आहेत. वैष्णवीला जन्मजात एकच किडनी असून सध्या ती पूर्णपणे निकामी झाली आहे व वैष्णवीवर आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करण्याची वेळ आलेली आहे. तसेच तिच्या हृदयामध्ये जन्मजात एक छिद्र आहे (Patent Ductus Arteriosus (PDA) व एप्रिल महिन्यामध्ये या हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया झाली आहे (PDA device closure) .

एप्रिल २०२५ पासून वैष्णविला आठवड्यातून 3 वेळेस डायलिसिस करावे लागत आहे किडनी वरील आजाराचा उपचार म्हणून तिला किडनी अवयव प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असून तिचे वडील श्री वसंत आव्हाड यांनी आपल्या मुलीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तिचे जर किडनी प्रत्यारोपण केले तर ती उर्वरित आयुष्य डायलिसिस मुक्त जीवन जगू शकते!

Leave a Comment

Your email address will not be published.