मुलीचे नाव #वैष्णवी_वसंतराव #आव्हाड, वय 21, राहणार मुक्काम पोस्ट रेनापुर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील असून, तिचे आई व वडील शेतमजूर आहेत. वैष्णवीला जन्मजात एकच किडनी असून सध्या ती पूर्णपणे निकामी झाली आहे व वैष्णवीवर आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करण्याची वेळ आलेली आहे. तसेच तिच्या हृदयामध्ये जन्मजात एक छिद्र आहे (Patent Ductus Arteriosus (PDA) व एप्रिल महिन्यामध्ये या हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया झाली आहे (PDA device closure) .
एप्रिल २०२५ पासून वैष्णविला आठवड्यातून 3 वेळेस डायलिसिस करावे लागत आहे किडनी वरील आजाराचा उपचार म्हणून तिला किडनी अवयव प्रत्यारोपणाचा ...
